December 21, 2025 7:59 PM

printer

इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये १९ नव्या वसाहती स्थापन करायला इस्रायल मंत्रिमंडळाची मान्यता

इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये १९ नव्या वसाहती स्थापन करायला इस्रायल मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. गेल्या २ महिन्यात मान्यता दिलेल्या वसाहतींची संख्या ६९ झाल्याची माहिती इस्रायलचे अर्थमंत्री बेट्झालेल स्मोट्रिच यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली आहे. या वसाहतींना विरोध करणाऱ्या पीस नाऊ या समूहानं दिलेल्या माहितीनुसार, या सरकारच्या कार्यकाळात २०२२मध्ये असलेल्या १४१ वसाहती आता वाढून २१० झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या वसाहती बेकायदा मानल्या जातात.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.