डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 13, 2025 1:51 PM | Iran | Israel

printer

इराणच्या अण्वस्त्र तळांवर इस्राएलचे हल्ले/ पश्चिम आशियात तणाव वाढला

इस्राएलने काल इराणच्या भूभागावर हल्ले केले त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचे ढग जमले आहेत. इराणवरची ऑपरेशन रायझिंग लायन ही कारवाई आणखी काही दिवस चालू राहील, असं इसराएलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं असून इसराएलमधे आणीबाणी जाहीर केली आहे.
नातांझ या इराणचा अण्वस्त्र तळावर हल्ला करुन इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा बीमोड केल्याचा दावा इसराएलनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रेव्हल्यूशनरी गार्डचे प्रमुख जनरल होस्सेन सलामी इराणचे लष्कर प्रमुख, मोहम्मद बाघेरी आणि अणुउर्जा संस्थेचे माजी प्रमुख फेरेदून अब्बासी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
इराणचं हवाईक्षेत्र तिथल्या सरकारनं पुढची सूचना मिळेपर्यंत बंद केलं आहे.
दरम्यान, ही कारवाई केवळ इसराएलनं केली असून अमेरिकेचा त्याच्याशी संबंध नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा