आंतरराष्ट्रीय स्तरावरुन वारंवार टीका होत असून देखील इस्राइलच्या लष्करानं गाझा पट्टीत हल्ले करणं अद्याप सुरूच ठेवलं आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं आणि स्थानिक रुग्णालयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार अनेक महिलांसह किमान 82 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हिजबुल संघटनेच्या प्रमुख रदवान दलाचा कमांडर ठार झाल्याचा दावा इस्राइलनं केला आहे. दरम्यान, गाझा भागात मदत पुरवण्याबाबत आपला इस्राइलसोबत करार झाल्याची माहिती संयुक्त अरब अमीरातींनी दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गाझामधल्या सुमारे 15 हजार नागरिकांना अन्नपुरवठा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांनी मात्र इस्राइलची सुरक्षा व्यवस्था अजूनही मदत कार्यात अडथळे आणून गाझामधल्या नागरिकांच्या समस्या वाढवत असल्याचं म्हटलं आहे.
Site Admin | May 22, 2025 10:10 AM
इस्राइलच्या हल्ल्यात गाझा भागातल्या 82 नागरिकांचा मृत्यू
