इस्राएलचा हल्ला सुरु असेपर्यंत आपण भविष्यातल्या आपल्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणार नसल्याचं नं म्हटलं आहे.
इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल जिनिव्हा मध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेला संबोधित केलं आणि इराण-इस्राएल दरम्यानचा तणाव तातडीनं कमी करण्याची विनंती केली. हा वाढता संघर्ष जागतिक सुरक्षेसाठी निर्णायक क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.