इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात ५१ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसंच दक्षिण गाझामधे असदा परिसरात निर्वासितांच्या छावण्यावर केलेल्या हल्ल्यात सहा बालकांसह सोळा पॅलिस्टिनींनी प्राण गमावले आहेत.
गेल्या चोवीस तासात कुपोषणामुळे आठ पॅलेस्टिनी नागरिक मरण पावले असून फक्त कुपोषणामुळे गेल्या दोन वर्षात २८१ जण दगावल्याचं पॅलेस्टीनी आरोग्य विभागानं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरस यांनी गाझातल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे.