इस्रायल आणि गाझामधील युद्धविराम संपल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढत चालला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काटझ् यांनी सैन्याला गाझाची अधिक भूभाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
पॅलेस्टिनी भूभागातून ताब्यात घेतलेल्या उर्वरीत ओलिसांना मुक्त करत नाही तोपर्यंत तो भूभाग अंशतः ताब्यात घेण्याची धमकी दिल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या भागातील कारवाई वाढत असल्याची पुष्टी इस्रायली सैन्याने केली आहे.
इस्रायलने नव्याने केलेल्या हल्ल्यात 590 हून अधिक पॅलिस्टिनी मारले गेले असल्याचं पॅलेस्टिनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.