January 3, 2025 8:32 PM | Israel

printer

इस्रायलनं गाझा पट्टीत काल केलेल्या हल्ल्यात बालकांसह ३० जण ठार

इस्रायलनं गाझा पट्टीत काल रात्री केलेल्या हल्ल्यात काही बालकांसह किमान ३० जण ठार झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. इस्रायलनं केलेल्या आदल्या दिवशीच्या हल्ल्यातही डझनभर नागरिक ठार झाले होते. त्यामुळं इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या २४ तासांत ठार झालेल्या नागरिकांची संख्या ५६ वर पोचली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.