डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 19, 2025 1:16 PM | Israe-Syria

printer

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीची घोषणा

इस्राएल आणि सीरियामध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याचं तुर्की मधले अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलं. इस्राएलनं सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर युद्धबंदी घोषित झाली. दरम्यान आपले हल्ले ड्रुझ या अरब धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचं रक्षण करण्यासाठी होते असा दावा इस्राएलनं केला आहे.

 

सीरियाचे दीर्घकाळ शासक राहिलेले बशर अल-असद यांच्या पतनानंतर सरकार समर्थक सैन्य आणि ड्रुझ समुदाय, यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. यामध्ये  आतापर्यंत ३००पेक्षा जास्त  लोक मारले गेले आहेत, तर या प्रदेशातले हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. या संघर्षामुळे मानवतावादी संकट निर्माण झालं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.