January 10, 2025 1:40 PM | ISLFootball

printer

ISL फुटबॉल : नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना पंजाब एफसी संघाशी होणार

गुवाहाटी इथल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना आज पंजाब एफसी संघाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात ओदिशा एफसी या संघाने चेन्नईन एफसी सोबत २-२अशी बरोबरी साधली होती.