IRCTC घोटाळ्यात राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धच्या खटल्याला स्थगिती द्यायला आज दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. तसंच, या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. आपल्या विरुद्ध झालेल्या आरोपनिश्चितीला आव्हान देणाऱ्या यादव यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या १४ तारखेला होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी आणि इतर ११ जणांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट रचणं आणि भ्रष्टाचाराच्या खटल्यात आरोप निश्चित करण्यात आले होते.
Site Admin | January 5, 2026 1:14 PM | IRCTC | Lalu Prasad Yadav
IRCTC घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धच्या खटल्याला स्थगितीला नकार