डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 17, 2024 1:36 PM | Iraq | Israel

printer

इस्रायली सैन्य लेबनॉनची हद्द ओलांडून ५ किलोमीटर अंतर्भागात/ इस्राएल वरच्या ५ ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी इराकमधल्या इस्लामिक रेझिस्टन्स, शिया पंथी गटानं स्वीकारली

इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्स, या शिया मिलिशिया गटानं आज दक्षिण आणि उत्तर इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या पाच ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दक्षिण इस्रायलमधील इलात बंदरातील चार महत्त्वाची ठिकाणे आणि लष्करी छावण्या आणि उत्तर इस्रायलमधील एक लष्करी छावणीला लक्ष्य करण्यात आलं असल्याचं या गटांन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. या ठिकाणांवर जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमधील लोकांना पाठिंबा म्हणून हे हल्ले करण्यात आले असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. इस्राइलमधील महत्वाच्या ठिकाणाना लक्ष करण्याचं काम सुरूच राहील असंही या गटानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला गाझा पट्टीमध्ये इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षाचा उद्रेक झाल्यापासून, इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्स या गटानं गाझामधील पॅलेस्टिनींना पाठिंबा दर्शवण्यासाठी इस्रायल आणि इस्राइलमधील अमेरिकेच्या विविध ठिकाणांवर वारंवार हल्ले केले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.