विदर्भानं तिसऱ्यांदा पटकावलं ‘इराणी चषक’

प्रथम वर्ग क्रिकेट मध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत, विदर्भानं आज शेष भारत संघाचा ९३ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या पाच दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात, अथर्व तायडेच्या १४३ आणि यश राठोडच्या ९१ धावांच्या जोरावर ३४२ धावा केल्या, तर शेष भारताचा डाव २१४ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात विदर्भानं २३२ धावा केल्या. त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३६० धावांची झाली. त्यानंतर,  शेष भारताचा दुसरा डाव २६७ धावात गुंडाळला. हर्ष दुबेनं चार बळी घेतले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.