स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इराणने रशियाच्या मदतीने आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी ही माहिती दिली. बुशेहरमध्ये चार आणि त्याच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर चार अणुऊर्जा प्रकल्प बांधले जातील. उत्तर गोलेस्तान प्रांतात बांधकाम आधीच सुरू झालं आहे, तर खुजेस्तान प्रांतातला अपूर्ण अणुऊर्जा प्रकल्प देखील पूर्ण केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. देशाची अणुऊर्जा निर्मिती २० हजार मेगावॅटपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्टं असल्याचं इस्लामी यांनी सांगितलं. दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्टं केलं की इराणचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण उद्देशानं आहे, शस्त्रं विकसित करण्याचा हेतू नाही.
Site Admin | November 3, 2025 7:32 PM | Iran | Power Plant | Russia
इराणची आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा