अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा इराणचा कोणताही इरादा नसल्यामुळे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्रांमार्फत इराणवर निर्बंध लावण्याचा केलेला प्रयत्न गैरलागू असल्याचं मत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकीयन यांनी व्यक्त केलं आहे.
याआधी पेझेशकीयन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांची अण्वस्त्रविषयक चर्चा झाली होती आणि त्यात पेझेशकीयन यांनी इराणचा अण्वस्त्रसज्जतेचा विचार नसल्याचं अधोरेखित केलं होत, तसेच युरोपियन देशांशी या संबंधात बोलणी करण्याची तयारी दर्शवली होती. पश्चिम आशियात शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची इच्छा मॅक्रोन यांनीही प्रदर्शित केली आहे.