डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पश्चिम आशियातल्या तणावाला इराण जबाबदार असल्याचा G7 देशांचा दावा

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, G7 देशांच्या नेत्यांनी आज इस्राएल आणि इराण दरम्यानच्या वाढत्या संघर्षाला संबोधित करणारं एक संयुक्त निवेदन जारी केलं. G7 च्या नेत्यांनी पश्चिम आशियातली शांतता आणि स्थैर्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला असून, इस्राएलच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दर्शवला आहे. संघर्षमय परिस्थितीत नागरिकांचं संरक्षण महत्त्वाचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. 

 

या प्रदेशात अस्थिरता आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी  इराण जबाबदार असून, इराणने अण्वस्त्रसज्ज होऊ नये, ही आपली भूमिका कायम असल्याचं G7 देशांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.