इस्रायल – इराणमध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिक तसंच भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मदतीसाठी तिथल्या भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. यासाठी मंत्रालयानं +98 9128109115 आणि +98 9128109109 हे संपर्क क्रमांकही जारी केले आहेत.
यासोबतच इराणमधल्या भारतीय तसंच भारतीय वंशाच्या नारिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, भारतीय दूतावासाने समाजमाध्यमांवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करावं, तसंच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सुरक्षा नियमांचं पालन करावं असं आवाहन करणारी मार्गदर्शक सूचनाही भारतीय दूतावासानं जारी केली आहे.