डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इराण बरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती

इराण बरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलने सहमती दिली आहे.  इराणने कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर काही तासांतच अमेरिकेने ही घोषणा केली. मात्र आतापर्यंत इस्रायलने त्याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झाल्यास इस्रायल ते सहन करणार नाही, असं इस्रायल सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू लवकरच युद्धबंदीबाबत आपलं अधिकृत निवेदन जारी करतील, असंही या निवेदनात म्हटलं आहे. 

 

गेले १२ दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे इराणमध्ये २२ जूनपर्यंत ८६५ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात २१५ लष्करी कर्मचारी, ३६३ नागरिक आणि २८७ अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. तर ३ हजार ३००हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मानवाधिकार वृत्तसंस्थेने दिली आहे. इस्रायलमध्येही इराणने क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान २४ नागरिकांचा मृत्यू झाला असून ६०० हून अधिक जखमी झाले आहेत. युद्धबंदीपूर्वी काही तासांत दक्षिण इस्रायलमधल्या बिरशेबाला या शहराचं मोठं नुकसान झालं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.