डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय

इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असल्यानं इस्रायलच्या लष्करानं मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय केले आहेत. जेरुसलेमच्या आकाशात आज काही क्षेपणास्त्र दिसल्याचं एका खाजगी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

 

गेल्या दहा दिवसांत, मध्य इस्रायलमध्ये मोठं नुकसान झाले आहे, उत्तरेकडील बंदर शहर हैफा इथंही वारंवार हल्ले झाले आहेत. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे व्यापक प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. संकट कमी करण्यासाठी मॉस्कोमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे.

 

दरम्यान, चीननं दोन्ही देशांना संघर्ष थांबवण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष कमी व्हावा आणि या समस्येवर राजकीय तोडगा काढण्यात यावा असं आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी आज केलं आहे.  इस्रायलसोबतचा सहकार्य करार स्थगित करण्यासाठी आणि शस्त्रास्त्र निर्बंध लादण्याबाबत विचार करण्यासाठी युरोपियन युनियनला विनंती करणार असल्याचं स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.