संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पुन्हा एकदा इस्राएल आणि इराण दरम्यानचा संघर्ष तात्काळ थांबवण्याचं आणि युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन केलं आहे. इस्राएल-इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि या समस्येचं आंतरराष्ट्रीयीकरण करू नये, असंही आवाहन केलं आहे.
कोणताही अतिरिक्त लष्करी हस्तक्षेप हा संपूर्ण प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर गंभीर परिमाण करू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. या संघर्षामुळे होत असलेल्या मनुष्यहानीबद्दल त्यांनी निषेध नोंदवला असून, केवळ राजनैतिक पातळीवरच हा प्रश्न सोडवता येईल, असं गुटेरस यांनी म्हटलं आहे.