इराणमधे सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराणमधल्या ३१ प्रांतांमधे १३ दिवसांची इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. यामुळे देशभरातली मोबाईल सेवादेखील विस्कळीत झाली आहे. २८ डिसेंबरला सुरू झालेल्या निदर्शनांमुळे माजलेल्या अराजकतेमुळे आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी निदर्शकांनी रस्ते अडवले असून सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू आहे.
Site Admin | January 9, 2026 1:25 PM | Internet Blackout | Iran
इराणमधल्या ३१ प्रांतांमध्ये १३ दिवसांची इंटरनेट बंदी