इराणमधे सरकारविरोधी निदर्शनांवर सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३ हजार ९० जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या तेहरानमधल्या बाजारपेठा खुल्या झाल्या असल्या तरी इंटरनेट अजूनही बंद आहे. इराणचे निर्वासित युवराज रेजा पहलवी यांनी नागरिकांना आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. इराणमधलं सरकार उलथून पाडलं तर आपण देशात परत येऊ असंही ते म्हणाले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना मृत्यूदंड दिला जाईल, असं अयातुल्लाह अहमद खतामी यांनी सांगितलं आहे. देशातल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर २८ डिसेंबरपासून इराणमधे आक्रमक आंदोलन सुरू झालं आहे.
Site Admin | January 17, 2026 12:40 PM | Iran
Iran: सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३ हजार ९० जण मृत्युमुखी