आय पी एल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या खेळाडूच्या 38 चेंडूतील 101 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला.
वैभवने आपल्या या तडाखेबंद खेळीत सात चौकार आणि 11 षटकार लगावले. आय पी एल च्या इतिहासात सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकवणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झालेली आहे. गुजरात टायटनच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सने 25 चेंडू राखत हे आव्हान पार केलं.