डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता खेळ सुरू होईल.

 

अहमदाबाद इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सनं निर्धारित २० षटकांत सहा गडी गमावून २२४ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत ६ बाद १८६ करता आल्या.