आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडीयमवर थोड्याच वेळात, साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.
राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल. अवघ्या १४ वर्षांच्या या फलंदाजानं गेल्या सामन्यात ३५ चेंडूत शतक ठोकलं होतं.