आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना दिल्लीत रंगणार आहे. सामना संध्याकाळी साडेसातला सुरु होईल.
काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटनच्या २०९ धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सने २५ चेंडू राखत हे आव्हान पार केलं.
अवघ्या १४ वर्ष वयाच्या वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत १०१ धावा फटकावत सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला. वैभवने आपल्या या तडाखेबंद खेळीत सात चौकार आणि ११ षटकार लगावले.