डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

IPL: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज लढत

आयपीएल क्रिकेटमध्ये आज जयपूरमधे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे.

 

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्स संघावर ५४ धावांनी मात केली. मुंबई इंडियन्स संघानं ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघ १६१ धावाच करू शकला.

 

कालच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेलं १६३ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं ९ चेंडू राखून पार केलं.