डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 19, 2025 1:19 PM | IPL Cricket

printer

IPL: स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ प्लेऑफ मधे दाखल

 आयपीएल च्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जच्या विजयामुळे दोन्ही संघांना प्लेऑफचं  तिकीट मिळालं , तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंही अंतिम चार  संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. शनिवारी बेंगळुरूमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यानं  गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतून बाद झाला.

 

आता उर्वरित एका प्लेऑफ स्थानासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ  सुपर जायंट्स यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. अव्वल स्थानावर असलेला  गुजरात टायटन्सचा संघ  टॉप-२ संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे. २०१४ नंतर  पंजाब किंग्जनं पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.  उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर पंजाब किंग्ज टॉप-२ च्या शर्यतीत टिकून राहील.

 

मुंबई इंडियन्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्धचे   दोन्ही सामने जिंकावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी  लखनऊ  सुपर जायंट्स संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मोठ्या फरकानं विजय मिळवणं आवश्यक आहे.