May 8, 2025 2:53 PM | IPL 2025

printer

IPL : क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला इथे सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू  होणार आहे.  

 

या स्पर्धेच्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा २ गडी राखून पराभव केला. कोलकाताने 180 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. चेन्नईने आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं. 

 

या सामन्यानंतर रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. समाज माध्यमांवर त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे.