डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 17, 2025 1:18 PM | IPL 2025

printer

एका आठवड्यानंतर आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू

एका आठवड्यानंतर आज पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. आज, यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम इथं संध्याकाळी साडेसात वाजता होईल.

 

यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळं नऊ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मोहाली आणि धरमशाला इथं आता सामने होणार नाहीत. २५ मे रोजी होणारा अंतिम सामना आता ३ जून रोजी होणार आहे. प्लेऑफ सामन्याची ठिकाणं यथावकाश जाहीर होतील.