डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आयपीएलचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित

 भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएलचे आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत.

 

त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं. सद्यस्थितीत बीसीसीआय देशासोबत खंबीरपणे असून, भारत सरकार, सशस्त्र दल आणि देशवासीयांच्या पाठीशी असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.