KKR मधून बांगलादेशी खेळाडूला वगळावं – BCCI चे निर्देश

२०२६ च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला संघातून वगळावं असं बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळाने सांगितलं आहे.  केकेआरने रहमानला आयपीएलच्या लिलावात ९ कोटी वीस लाख रुपयांना खरेदी केलं आहे. बांगलादेशात एका हिंदू तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी खेळाडूला आयपीएलमधे घेण्यावरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने बांगलादेशी खेळाडूला वगळण्यास सांगितलं आहे, या खेळाडूच्या ऐवजी दुसरा खेळाडू निवडण्याची संधी केकेआर संघाला मिळणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.