डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

IPL सामने पुन्हा रंगणार…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे १७ मे पासून पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकता नाईट रायडर्स संघांमध्ये बेंगळुरू इथं सामना होईल. तर ८ मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये अर्ध्यावर सोडलेला सामना आता २४ मे रोजी जयपूरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ९ मे पासून आयपीएलचे उर्वरीत सामने स्थगित केले होते. आता पुन्हा एकदा हे सामने खेळले जाणार आहेत.

 

Image