आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं बाद फेरीतलं स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघानं २० षटकांत १८० धावा केल्या. दिल्ली संघाचा डाव १८ षटकं आणि २ चेंडूत १२१ धावांवर आटोपला.
आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. खेळ संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. गुजरात टायटन्स संघ आधीच बाद फेरीत दाखल झाला आहे.