आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनऊ इथं सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
दरम्यान, काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ३९ धावांनी पराभव केला. गुजरातनं १९९ धावांचं लक्ष्य दिलं होतं, परंतु कोलकाताचा संघ १५९ धावाच करू शकला. गुजरातचा हा सहावा विजय आहे.