डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 11, 2025 7:11 PM | IOAA 2025

printer

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू झालं. या स्पर्धेचं आत्तापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत, अशी माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी दिली.

 

१० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश खगोलशास्त्रात गती असणाऱ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणं, त्यांच्यात संवाद घडवून आणणं हा आहे, असं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचे अध्यक्ष प्राध्यापक अनिकेत सुळे यांनी सांगितलं. भारताकडून पाच विद्यार्थ्यांचा चमू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांचं नेतृत्व हरविंदर कौर जस्सल आणि जसजीत सिंह बागला हे दोघे करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा