INVAR रणगाडारोधी क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने भारत डायनामिक्स लिमिटेडबरोबर करार केला. २ हजार ९५ कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे T-90 रणगाड्याची क्षमता वाढणार आहे. या खरेदीमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार आहे. स्वदेशी संस्थांकडून तंत्रज्ञान घेण्याच्या निर्णयामुळे आत्मनिर्भरतेचा उद्देश साधला जाणार आहे असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.