येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यांत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरापासून वाड्या वस्त्यांपर्यंत योग दिनाचं आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. योग दिनाचं आयोजन यशस्वी व्हावं यासाठी डिजिटल मदत घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं.
सातारा जिल्ह्यातही योग दिनाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या आहेत.
योग दिनाच्या निमित्ताने आज जनजागृतीसाठी सोलापूर जिल्ह्यात योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय संचार ब्युरो आणि योग दिवस समन्वय समिती यांनी संयुक्तपणे ही दिंडी काढली.