डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

यंदा साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. याच दिवशी योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेने विश्व योग दर्शन यांच्या सहकार्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सांगलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं मुख्य केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीनं एकाच तालावर आणि एकाच वेळी योगासनं करण्यात येणार आहेत.

 

नाशिक जिल्ह्यात योगदिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग जनजागृती सत्राचं आयोजन केलं आहे. आतापर्यंत या अभियानाच्या माध्यमातून नाशिकमधल्या ५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबासाठी मोफत योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं. योग दिनी होणाऱ्या सत्रातही सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन विद्यापीठाने केलं आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा