डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Women’s Day: मध्य रेल्वेनं संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेनं आज संपूर्ण महिला चमू असलेली एक विशेष गाडी चालवली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज सकाळी ही वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीच्या दिशेनं रवाना झाली. या गाडीत लोको पायलट, सहायक लोको पायलट, रेल्वेगाडी व्यवस्थापक, तिकीट तपासक, तसंच आहारसेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचारी महिला आहेत.