डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.  तू भारतापासून खूप दूर असलास तरी भारतीयांच्या जवळ, त्यांच्या हृदयात आहेस. तुझ्या प्रवासानं नव्या युगाचा शुभारंभ केला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी शुभांशु यांचं कौतुक केलं आणि त्यांना त्यांच्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

भारताचं प्रतिनिधीत्व करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना शुभांशु यांनी व्यक्त केली. मी कधी अंतराळवीर होईन, असं मला वाटलं नव्हतं असं सांगत शुक्ला यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीयांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनेक संधी मिळत आहेत. 

 

क्सिओम ४ मोहिमेअंतर्गत बुधवारी अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशात पाठवण्यात आलेल्या यानातल्या चमूत शुक्ला यांचा समावेश आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा