आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेसएक्सचं कॅप्सूल आज सकाळी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचलं. यात अमेरिका, जपान आणि रशियाच्या चार अंतराळवीरांचा समावेश आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर येत्या बुधवारी पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करतील, अशी अपेक्षा आहे. त्यांची जागा हे चार नवे अंतराळवीर घेतील. हे दोघे फक्त एका आठवड्यासाठी अवकाशात गेले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा तिथला मुक्काम नऊ महिन्यांपर्यंत पोहोचला.