डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या टपाल सेवेला आजपासून पुन्हा सुरूवात

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर या वर्षी 22 ऑगस्टपासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल.

 

अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र ही सुविधा फक्त केंद्र सरकारच्या टपाल विभागालाच उपलब्ध आहे. खासगी कुरियर सेवेला तिचा लाभ घेता येणार नाही.