ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांकडून कौतुक

दहशतवादाविरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांनी कौतुक केलं आहे. अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी डॉन स्पेन्सर आणि ऑस्ट्रियातले तज्ञ लेखक टॉम कूपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे. दहशतवादाविरोधात लढताना अण्वस्त्रांच्या धमकीसमोर न झुकण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रशंसनीय असल्याचा उल्लेख दोन्ही तज्ज्ञांनी आपापल्या समाज माध्यमावरच्या लिखाणात केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.