मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं त्या दिवसाच्या निमित्ताने आज आंतरराष्ट्रीय चंद्र दिन साजरा केला जात आहे. १९६९ मध्ये अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने अपोलो ११ मोहीम आखली होती. २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. या दिवसाच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०२१मध्ये या दिवसाची अधिकृत घोषणा केली. या दिवसाच्या निमित्ताने जगभरात विविध उपक्रम, आकाशदर्शन, विज्ञानावर आधारित स्पर्धांचं आयोजन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.