ऑस्ट्रेलियात सनशाइन कोस्ट इथं झालेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणितऑलिंपियाड मध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीला सुवर्णपदक मिळालं आहे. तसंच दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता यांनाही सुवर्णपदक मिळालं आहे. सहा स्पर्धकांच्या भारतीय संघाने ३ सुवर्ण , २ रौप्य आणि १ कांस्य पदकं मिळवली आहेत. कर्नाटकचा अबेल जॉर्ज मॅथ्यू आणि दिल्लीचा आदिश जैन यांना रौप्य पदक तर दिल्लीच्या अर्चित मानस ला कांस्य पदक मिळालं.
Site Admin | July 19, 2025 7:13 PM | International Mathematical Olympiad
आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीला सुवर्णपदक