डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

काश्मीर खोऱ्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन

काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये काल पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलो व्ह्यू इथून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये देशभरातील सतराशेहून अधिक धावपटू आणि 12 परदेशातील खेळाडूंनी भाग घेतला. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मॅरेथॉनमधील विजेत्यांचा सत्कार केला. गेल्या काही वर्षांत विक्रमी संख्येनं पर्यटकांचं आगमन या भागातील शांतता, प्रगती आणि समृद्धीची साक्ष असल्याची भावना सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केली.