डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 19, 2024 2:47 PM | IFFI2024 | IFFI55

printer

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून गोव्यात

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून गोव्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवात ८१ देशांमधले एकूण १८० चित्रपट प्रदर्शित केले जातील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल वार्ताहर परिषदेत या महोत्सवाच्य़ा आयोजनाबाबत माहिती दिली. महोत्सवस्थळी जाण्यासाठी विनाशुल्क वाहन व्यवस्था तसंच चोख सुरक्षा व्यवस्था असल्याचं त्यांनी नमूद केलं. जागतिक चित्रपटाच्या दुनियेतले आगळेवेगळे स्वर आणि नवोन्मेषशाली कथन अधोरेखित करणाऱ्या इफ्फी या महोत्सवाचं हे पंच्चावन्नावं वर्ष आहे. इफ्फी हा जागतिक सिनेमाविश्व आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.