देशविदेशातही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं आहे. नेपाळमधल्या भारतीय दुतावासानं आज पोखरा इथल्या फेवा सरोवर परिसरात योगसत्र आयोजित केलं होतं. या सत्रात शेकडो योगप्रेमी सहभागी झाले होते.
सौदी अरबमधला भारतीय दूतावासानं रियाध इथल्या प्रिन्स फैझल बिन फहाद क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणात योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं आहे. कतारमध्ये दोहा इथं आयडियल इंडियन स्कूलच्या प्रांगणात योगदिन साजरा केला जाणार आहे.