डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जगभरात आज ‘आंतरराष्ट्रीय आपदा जोखीम शमन’ दिवस साजरा

जगभरात आज आंतरराष्ट्रीय आपदा जोखीम शमन दिवस साजरा झाला. संपूर्ण जगात आपदा जोखीमीबाबत जागरुकता निर्माण करणं तसंच आपदा जोखीम कमी करण्याची संस्कृती रुजवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ‘सशक्त भारतासाठी पुढच्या पिढीचं सक्षमीकरण’ ही या वर्षीच्या दिवसांची मुख्य संकल्पना आहे. आपदा मुक्त भविष्यासाठी युवकांचं रक्षण आणि त्यांच्या सक्षमीकरणात शिक्षणाचं योगदान यावर ही संकल्पना भर देते.  यावर्षी बालकांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवण्यावरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे.