December 3, 2025 6:10 PM | rapido | Uber

printer

बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपीडो, उबेर कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक केल्याबद्दल रॅपिडो या ऍप आधारित कंपनीविरोधात मुंबईतील घाटकोपर इथं गुन्हा दाखल झाला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रॅपीडो, उबेर यासारख्या ऍप आधारित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते, त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. शासनानं नुकतंच ई बाईक धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार अनेक ऍप आधारित बाईक, टॅक्सी चालक कंपन्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, चालकांना नियमावली आणि प्रवासी सुरक्षिततेविषयी प्रशिक्षण न देता त्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं उघड  झालं आहे. यासह अनेक तक्रारी परिवहन मंत्र्यांना प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.